Surprise Me!

पंतप्रधानांच्या पदवीबाबत Sharad Pawar यांची रोखठोक भूमिका | PM Narendra Modi Degree| NCP| BJP| Adani

2023-04-10 934 Dailymotion

अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते या प्रश्नावर चांगलेच संतापले. हा असा मुद्दा आहे ज्यावर कधीही चर्चा होऊ शकते, मात्र सध्या देशापुढे अनेक असे प्रश्न आहेत ज्यावर चर्चा व्हायला हवी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्या देशात गरिबी, महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक प्रश्न आहेत. त्यावर नेत्यांनी लक्ष देणं, चर्चा घडवून आणणं महत्त्वाचं आहे. जे मुद्दे आनावश्यक आहे त्यावर कधीही चर्चा होऊ शकते, असंही पवार म्हणाले. मात्र ठाकरे गट आणि केजरीवाल यांच्याकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला जात असताना शरद पवार यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.<br /><br />#SharadPawar #PMNarendraModi #UddhavThackeray #ArvindKejriwal #Shivsena #EknathShinde #BJP #SanjayRaut #VijayWadettiwar #Congress #Ayodhya

Buy Now on CodeCanyon